अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI series between IND and WI) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील तिसरा सामना आज (शुक्रवारी) अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे.
भारताकडे क्लीन स्वीप देण्याची संधी :
तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या वनडे सामन्यात शिखर धवनचा (Batsman Shikhar Dhawan) भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. या अगोदच्या सामन्यांना शिखर धवन मुकला होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता या मधून तो रिकव्हर झाला आहे. तसेच भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाला मायदेशात क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माला सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढण्याची संधी :
या सामन्यात रोहित शर्माला सचिन तेंडूलकरचा एक विक्रम मोडीत काढत (Rohit will break Sachin Tendulkar record), त्याला मागे टाकण्याची संधी असणार आहे. सध्या रोहित शर्मा हा वनडेत वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक (Most ODI runs against West Indies) धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडूलकर 1024 धावांसह पहिल्या, सौरव गांगुली 1015 धावांसह दुसऱ्या आणि रोहित शर्मा 1011 धावांसह तिसरऱ्या स्थानी आहे. त्यामुळे त्याला हा विक्रम करण्याची संधी आहे.