महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 7, 2022, 9:21 AM IST

ETV Bharat / sports

INDvsWI 1ST ODI : ऐतिहासिक सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने 6 विकेट्स राखून जिंकला (India won by 6 wickets) आहे. त्याचबरोबर भारताने मालिकेत 1-0 ने अशा फरकाने आघाडी घेतली आहे.

INDvsWI 1ST ODI
INDvsWI 1ST ODI

अहमदाबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये 1000 वनडे सामने खेळण्याचा ऐतिहासिक (India's 1000th ODI) टप्पा देखील भारतीय संघाने पार केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकांत सर्वबाद 176 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला 177 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 28 षटकांत 4 गडी गमावून 178 धावा करत आव्हान पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या ऐतिहासिक सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी (India leads the series 1-0) घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने जेसन होल्डरच्या 57 आणि फॅबियन ऍलेनच्या 29 धावांच्या जोरावर 150 धावांचा टप्पा पार केला. तसेच संघाचा कर्णधार किरोन पोलार्ड हा आपले खाते ही उघडू शकला नाही. त्याचबरोबर इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी ठराविक अंतराने आपल्या विकेट्स गमावल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघ 43.5 षटकांत सर्वबाद 176 धावाच करू शकला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या (Yuzvendra Chahal took 4 wickets). त्याचबरोबर त्याने आपल्या वनडे क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्स टप्पा देखील पूर्ण (Yuzvendra Chahal takes 100 wickets ODIs) केला. तसेच वाशिंग्टन सुंदर 3, प्रसिद्ध कृष्णा 2 आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

177 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. भारतीय सलामी फलंदाजाने पहिल्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 60 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर विराट कोहली 8, इशान किशन 28 आणि रिषभ पंत 11 धावा काढून बाद झाले. तसेच सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा हे दोघे अनुक्रमे 34 आणि 26 धावांवर नाबाद राहत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.भारतीय संघाने 28 षटकांत 4 गडी गमावून 178 धावा करत आव्हान पूर्ण केले. वेस्ट इंडिज संघाकडून अल्झारी जोसेफ ने 2 आणि अकील हुसैनने 1 विकेट्स घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details