दुबई: श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे आयसीसीच्या अव्वल खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीवर ( India cricketers in ICC T20 rankings ) आहेत. फ्लोरिडा येथे मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात अय्यरने प्रभावी अर्धशतक ठोकले. त्यामुले या फलंदाजाने क्रमवारीत एकूण सहा स्थानांनी झेप घेत 19व्या स्थानावर पटकावले. पंतने चौथ्या सामन्यात 44 धावा करत 115 धावांसह दुसरा आघाडीचा धावा करणारा खेळाडू म्हणून मालिका पूर्ण केली. त्यामुळे डावखुरा फलंदाज सात स्थानांनी 59व्या स्थानावर पोहोचला आहे.
उदयोन्मुख सलामीवीर सूर्यकुमार यादवने ( Opener Suryakumar Yadav ) या मालिकेत सर्वाधिक 135 धावा केल्या होत्या, परंतु बाबरला मागे टाकण्याची संधी गमावली. कारण त्याला अंतिम सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. टी-20 क्रमवारीत यादव दुसऱ्या स्थानावर कायम आहे. या महिन्याच्या अखेरीस दुबई येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी बाबर आता 13 रेटिंग गुणांनी आघाडीवर ( Babar Azam tops in T20 rankings ) आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनीही आश्चर्यकारक कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना गोलंदाजी क्रमवारीत मदत झाली.
युवा फिरकीपटू रवी बिश्नोई ( Young spinner Ravi Bishnoi ) या मालिकेदरम्यान आठ विकेट्ससह भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज होता. 21 वर्षीय रवी गोलंदाजांच्या यादीत 50 स्थानांनी पुढे 44व्या स्थानावर पोहोचला आहे. सहकारी आवेश खान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही आघाडी घेतली, तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान अवघ्या तीन बळींनंतर नवव्या स्थानावर घसरला.