लंदन -भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे नियोजित पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठली. इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघावर गंभीर आरोप केले. आता या कसोटीविषयी मोठे अपडेट समोर आले आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळू शकतो. उभय संघात ओल्ड ट्रॅफोर्ड येथे हा सामना खेळला जाईल.
इंग्लंड 2022 च्या शेड्यूलमध्ये या सामन्याचा समावेश होऊ शकतो. याविषयीची चर्चा सुरू आहे. या सामन्याने 2021 मधील कसोटी मालिका पूर्ण होईल. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.