बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात बंगळुरु येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला 238 धावांनी पराभूत केले ( India won by 238 runs ). त्याचबरोबर हा सामना जिंकत भारताने श्रीलंकेला 2-0 अशा फरकाने क्लीन स्वीप देखील दिला आहे. भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला होता. तसेच श्रीलंकेला विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु श्रीलंकेचा दुसरा डाव 208 धावांत गारद झाला.
श्रीलंका संघाने तिसऱ्या दिवशी 1 बाद 28 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली होती. ज्यामध्ये श्रीलंका संघाकडून दिमुथ करुनारत्ने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने 174 चेंडूचा सामना करताना 15 चौकार लगावत दमदार 107 धावांची ( Dimuth Karunaratne scored a century ) खेळी केली. त्याची ही खेळी तरी देखील त्याच्या संघाचा पराभव रोखू शकली नाही. कारण या धडाकेबाज फलंदाजाला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 54 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एक ही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनने सर्वाधिक विकेट्स ( Ravichandran Ashwin took the most wickets ) घेतल्या. त्याने 19.3 षटके गोलंदाजी करताना, त्याने 55 धावा देताना आपल्या फिरकीच्या जाळ्यात चार फलंदाजांना अडकवले. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने तीन अक्षर पटेलने दोन आणि जडेजाने एक विकेट्स घेतली. तसेच या कसोटीत भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या श्रेयस अय्यरला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर रिषभ पंतला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
पहिला डाव -
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाने 59.1 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने केल्या. त्याने 92 धावांची महत्वपूर्ण केली होती. श्रीलंकेकडून एम्बुल्देनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंकेचा पहिला डाव 35.5 षटकांत 109 धावांवर गुंडाळला होता. श्रीलंकेकडून एंजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक धावा ( Angelo Mathews scored the most runs ) केल्या होत्या. त्याने 85 चेंडूत 43 धावांची खेळी साकारली होती. तसेच भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्याने प्रथम भारताता खेळताना पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.