टोकियो - जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्व जगजाहीर आहे. या दोन दिग्गजांमधील टशन पाहण्यासाठी चाहते नेहमी आतूर असतात. इंग्लंड दौऱ्यात विराट-अँडरसन यांच्यात आमना-सामना होत आहे. पण यात विराट कोहली धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जेम्स अँडरसन विराटवर भारी पडल्याचे चित्र आहे. आजपासून ओवलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात पुन्हा दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल.
जेम्स अँडरसन याने ट्रेंट ब्रिज आणि लीड्स कसोटी सामन्यात विराट कोहलीला बाद केले. यानंतर त्याने जोरदार जल्लोष साजरा केला होता. याचे कारण अँडरसन याने सांगितलं आहे. जेम्स अँडरसन याने इंग्रजी वृत्तपत्र द टेलीग्राफसाठी कॉलम लिहला आहे. यात तो म्हणतो, लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीला बाद केल्यानंतर मी खूप भावूक झालो होतो. हे ट्रेंट ब्रिज सारखं होतं. मला वाटतं त्याच्याविरुद्ध काही गोष्टी अतिरिक्त आहेत. कारण तो एक शानदार फलंदाज आहे. तसेच तो कर्णधार देखील आहे. तुम्ही पाहिलं असाल, जेव्हा भारतीय गोलंदाज विकेट घेतात, तेव्हा त्याचा विराटसाठी काय अर्थ होते. यामुळे मी त्याला दाखवू इच्छित आहे की, त्याला बाद करण्याची काय अर्थ होते.