कोलंबो:कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात झालेल्या इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने भारतापुढे मोठी धावसंख्या उभारली होती. पाकिस्तानच्या संघाने 50 षटकांमध्ये 8 गडी गमावून 352 धावा केल्या होत्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारत अ संघाचा डाव 40 षटकांत केवळ 224 धावात संपला. या मोठ्या सामन्यात 71 चेंडूत 108 धावांची तुफानी खेळी करणारा पाकिस्तानचा उजव्या हाताचा फलंदाज तैयब ताहिर याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव : बांगलादेशविरुद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ २११ धावांवर बाद झाला. बांगलादेशच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि 18 व्या षटकापर्यंत त्यांची धावसंख्या एका विकेटवर 94 अशी झाली. यानंतर निशांत सिंधू आणि मानव सुतार या भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशचा डाव 160 धावांत गुंडाळला. कर्णधार यश धुलची ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण याचाही भारताच्या विजयात मोलाचा वाटा आहे. भारताच्या बहुतेक खेळाडूंनी आतापर्यंत योगदान दिले आहे. ते पाकिस्तानविरुद्ध आपला चांगला फॉर्म सुरू ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे कमी लेखू नये कारण त्यांच्या संघात अनेक खेळाडू आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय सामने आणि पाकिस्तान सुपर लीग खेळण्याचा अनुभव आहे. अष्टपैलू मोहम्मद वसीम, कर्णधार मोहम्मद हरीस, सलामीवीर साहिबजादा फरहान आणि वेगवान गोलंदाज अर्शद इक्बाल यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे तर अमाद बट आणि ओमर युसूफ यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे.