कोलकाता :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला असून दुसरा सामना आज (शुक्रवारी) ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला (West Indies opt to bowl ) होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करुन वेस्ट इंडिजसमोर १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानांचा पाठलाग करत असतांना वेस्ट इंडिजचा८ धावांनी पराभव झाला.या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाला पहिला धक्का ईशान किशनच्या रुपाने बसला. तो दुसऱ्या षटकांत 2 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 49 धावांची खेळी केली. त्याचबरोबर रोहित शर्मा वैयक्तिक 19 धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ नुकताच आलेला सुर्यकुमार यादव 8 धावा काढून तंबूत परतला. त्यामुळे भारतीय संघाने 10 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 76 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आज फॉर्ममध्ये दिसून येत आहे. कारण त्याने भारतीय संघाची एक बाजू सांभाळली आहे. त्याने 27 चेंडूचा सामना करताना 6 चौकारांच्या मदतीने 36 धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर रिषभ पंत 4 धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना रॉस्टन चेसने दोन गडी बाद केले आहेत. त्याचबरोबर शेल्डन कॉट्रेलने 1 विकेट घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघाची कमान कर्णधार रोहित शर्माच्या ( Captain Rohit Sharma ) खांद्यावर आहे. त्याचबरोबर भारतीय संघाता नियमित उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यामुळे ही जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर (Vice-captain Rishabh Pant ) आहे. आज खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही काही बदल करण्यात आलेला नाही.
वेस्ट इंडिज आणि भारतीय संघात आतापर्यंत 18 टी-20 सामने झाले आहेत. त्यापैकी 11 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच एक सामना अनिर्णीत राहिला आहे. आज होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाला हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ कर्णधार किरॉन पोलार्डच्या ( Captain Kieron Pollard ) नेतृत्वाखाली मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करताना दिसेल.