IND vs WI 4th T20I :भारताने शनिवारी चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या जोरावर वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी पराभव केल्याने ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी अजेय आघाडी घेतली. भारताने 20 षटकांत 5 बाद 191 अशी भक्कम धावसंख्या उभारल्यानंतर वेस्ट इंडिजला 19.1 षटकांत 132 धावांवर रोखले. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बाश्नोईने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने १२ धावांत तीन बळी घेतले आहे. कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी 24- 24 धावा केल्या आहेत.
या अगोदर, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताने वेगवान सुरुवात करत 4.4 षटकात 53 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या आहेत.