त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला ( IND vs WI T20 Series ) आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना ब्रायन लारा स्टेडियम त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार आहे, तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून ( West Indies opt to bowl ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
या अगोदर भारत आणि वेस्ट इंडिज संघात तीन सामन्याची वनडे मालिका पार पडली आहे. ज्या मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. त्यामुळे आज ही भारतीय संघ त्याच निर्धाराने मैदानात उतरण्यास उत्सुक असणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा मागील मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज असणार आहे.