मुंबई - शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी आज सोमवारी रवाना झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामुळे बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यावर दुसऱ्या फळीतील खेळाडू पाठवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या दौऱ्यात भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहे.
बीसीसीआयने भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणाऱ्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. तसेच काही खेळाडूंनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर पहिले काही दिवस क्वारंटाइन होईल. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सरावाला परवानगी मिळणार आहे.
दरम्यान, भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान, भारताचा दुसरा संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले असून या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. चेतन सकारीया, देवदत्त पड्डीकल, नितिश राणा अशा बऱ्याच खेळाडूंचा हा पहिलाच दौरा आहे.
असा आहे भारताचा श्रीलंका दौरा