मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( IND vs SL ) संघात कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना आहे. या सामन्यात विराट कोहली आपल्या वैयक्तिक 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर आता विराट कोहलीच्या आउट होण्याबाबत केलेले भविष्यवाणीचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्याबद्धल वीरेंद्र सेहवागने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.
व्हायरला होत असलेल्या भविष्यवाणीच्या ट्विटमध्ये जसे लिहले होते, तेच आजच्या सामन्यात विराट कोहली सोबत झाले. श्रुती नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन रात्री एक ट्विट करण्यात आले होते. ज्यामध्ये लिहले होते की, विराट कोहली आपल्या 100 व्या कसोटी ( Virat Kohli 100th Test ) सामन्यात शतक ठोकू शकणार नाही. त्याचबरोबर तो 4 कवर ड्राइवच्या साथीने 100 चेंडूत 45 धावा करेल. त्यानंतर एम्बुल्डेनिया त्याचा स्टंप उखडून टाकेल आणि तो आश्चर्यचकित होईल. तसेच तो निराशेने आपले डोके हलवेल.