कोलंबो - भारत आणि श्रीलंका यांच्यात आज खेळवण्यात येणारा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आजचा सामना अचानक स्थगित करण्यात आला.
कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विलगिकरणात जावे लागणार आहे. या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना विलगिकरणातच रहावे लागणार आहे.
सूत्रांनी याविषयी एएनआयला माहिती दिली की, कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यामुळे दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला. इतर खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हा सामना बुधवारी खेळवण्यात येईल. सध्या सर्व खेळाडू विलगिकरणात आहेत.
दरम्यान, भारतीय युवा संघ शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात तीन सामन्याची टी-20 मालिका खेळवली जात आहेत. यातील पहिला सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 ने अशी आघाडी घेतली आहे. आज उभय संघात दुसरा सामना होणार होता. परंतु तो स्थगित करण्यात आला आहे.
हेही वाचा -VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया
हेही वाचा -Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा