बंगळुरु :भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने ( Jaspreet Bumrah vice-captain of India ) शुक्रवारी सांगितले की, लेग-स्पिनर कुलदीप यादवला कसोटी संघातून वगळण्यात आलेले नाही. त्याऐवजी त्याला दोन महिने चालणाऱ्या आयपीएल 2022 खेळण्यापूर्वी कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी बायो-बबलमधून ब्रेक देण्यात आला आहे. 12 मार्चपासून बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी कुलदीपला मंगळवारी भारतीय संघातून वगळण्यात आले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला तंदुरुस्त घोषित ( Axar Patel declared fit ) केल्यानंतर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने त्याचा संघात समावेश केला होता.
मात्र, त्यावेळी बीसीसीआयने चायनामन गोलंदाजाला संघातून वगळण्यामागे कोणतेही विशेष कारण दिले नव्हते. बुमराह म्हणाला, बघा, कुलदीपला वगळण्यात आलेले नाही. तो बराच काळ बायो-बबलमध्ये होता आणि त्याला घरी जाण्याची संधी मिळत नव्हती. दुसरी कसोटी खेळण्याची शक्यता कमी असल्याने त्याला आयपीएलपूर्वी काही वेळ कुटुंबासोबत घालवण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
बुमराह पुढे म्हणाला, खेळाडूचे आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे, कारण बायो-बबलमध्ये जगणे ( Living in a bio-bubble ) इतके सोपे नाही. साहजिकच प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामना खेळायचा असतो. पण मानसिक पैलूही महत्त्वाचा असून कुलदीपला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. पण यावेळी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय दोन महिन्यांच्या आयपीएलला लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. जिथे तो त्याच्या कुटुंबापासून दूर राहणार आहे.