हैदराबाद:भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 12 मार्चला बंगळुरु येथे खेळला जाणार आहे. हा सामना पिंक बॉल कसोटी सामना ( Pink Ball Test Match ) आहे. म्हणजेच तो डे-नाइट खेळला जाणार आहे. त्यामुळे आज आपण डे-नाइट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडू का वापरतात आणि त्यामध्ये भारताची कामगिरी कशी राहिली आहे. ते जाणून घेणार आहेत.
भारताने आपला पहिला डे-नाइट कसोटी सामना ( India first day-night Test match 2019 ) साली खेळला होता. हा सामना भारत विरुद्ध बांगलादेश असा झाला होता. तसेच हा सामना ईडन गार्डन्स येथे खेळला होता. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला होता. ज्यामध्ये भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय संपादित केला होता. तसेच या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहली अजून शतक लगावता आले नाही.
डे-नाइट कसोटी सामन्यात पिंक बॉल का वापरतात?
- क्रिकेटची सुरुवात लाल चेंडूने झाली. पण दिवस रात्रीचे सामने आल्याने क्रिकेटच्या मैदानावर पांढऱ्या चेंडूचा समावेश झाला.
- लाल चेंडू दिवसा चांगला दिसतो, तर पांढरा चेंडू रात्री खेळाडूंना चांगला दिसतो.
- पण जेव्हा दिवस-रात्र कसोटी सामन्यांचे आगमन झाले. तेव्हा गुलाबी चेंडूला प्राधान्य देण्यात आले. दोन्ही चेंडूंच्या टिकाऊपणात तफावत असल्याने हे केले गेले.
- कसोटी सामन्यात, चेंडू एका डावात सुमारे 80 षटके ठेवावा लागतो. त्यानंतरच तुम्ही नवीन चेंडू घेऊ शकता.
- पांढऱ्या बॉलचा रंग लवकर निघू लागतो. खेळाडूंना रंग निघाल्यानंतर पाहण्यात अडचण येते. कसोटी सामन्यात पांढऱ्या चेंडूने 80 षटके खेळणे शक्य नसते.
- दिवसा रात्रीच्या सामन्यासाठी पांढरा चेंडू पूर्णपणे योग्य आहे. पण त्याचा रंगही लवकर निघतो.
- 30 षटकांनंतर कोटिंग उतरण्यास सुरवात होते. T20 आणि ODI मध्ये कोणतीही अडचण नाही, पण कसोटी सामन्यात चेंडू 80 षटकांचा ठेवावा लागतो. अशा स्थितीत कसोटी सामन्यात पांढऱ्या चेंडूने खेळणे शक्य होत नाही.
- गुलाबी चेंडू बनवताना त्यातील रंगाची खूप काळजी घेतली जाते. त्यात रंगाचे अनेक थर लावले जातात. अशा स्थितीत त्याचा रंग फार काळ उडत नाही. त्याची दृश्यमानता खूप चांगली आहे. त्यामुळेच कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर केला जातो.
गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात भारताची कामगिरी -
- कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर भारताने नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली गुलाबी चेंडू कसोटी खेळली.
- त्यांनी बांगलादेशींचा पराभव केला आणि एका डावात सहज विजय मिळवला.
- विराट कोहलीने 136 धावा करून आपले 27 वे कसोटी शतक झळकावले आणि यादरम्यान पिंक कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
- भारताचा दुसरा गुलाबी चेंडूचा सामना डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.
- फॉर्मेटमध्ये खेळलेला भारतासाठी हा सर्वात निराशाजनक खेळ होता. कारण भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाकडून आठ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
- फेब्रुवारी २०२१ मध्ये, भारताने तिसरी गुलाबी चेंडू कसोटी इंग्लंडविरुद्ध खेळली. अहमदाबादमध्ये भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. 6/38 आणि 5/32 च्या आकड्यांसह, अक्षर पटेलने इंग्लंडवर भारताच्या 10 विकेट्सने विजय मिळवला.