बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्यातील दुसरा दिवस रविवारी पार पडला. भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला 447 धावांचे लक्ष्य दिले. त्याचबरोबर श्रीलंकेने दुसऱ्या दिवस अखेर आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करताना 1 बाद 28 धावा केल्या आहेत.
पिंक बॉल कसोटी ( Pink Ball Test ) सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत. आज (सोमवारी) या कसोटीचा तिसरा दिवस आहे. त्याचबरोबर श्रीलंकाला विजयासाठी 419 धावांचे आवश्यकता आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी फक्त 9 विकेट्सची गरज आहे. हे आव्हान श्रीलंका संघासाठी कठिण असणार आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून भारत क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
पहिला डाव -
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय संघाने 59.1 षटकांत सर्वबाद 252 धावा केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने केल्या. त्याने 92 धावांची महत्वपूर्ण केली होती. श्रीलंकेकडून एम्बुल्देनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.
श्रीलंकेचा पहिला डाव 35.5 षटकांत 109 धावांवर गुंडाळला होता. श्रीलंकेकडून एंजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक धावा ( Angelo Mathews scored the most runs ) केल्या होत्या. त्याने 85 चेंडूत 43 धावांची खेळी साकारली होती. तसेच भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्याने प्रथम भारताता खेळताना पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
दुसरा डाव -
भारतीय संघाने आपला दुसरा डाव 68.5 षटकांत 9 बाद 303 धावांवर घोषित केला आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी शानदार अर्धशतक लगावले. यामध्ये श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले, तर रिषभ पंतने ( Rishabh Pant record ) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक लगावले आहे. त्याने 28 चेंडूत अर्धशतक करताना कपिल देव यांचा 30 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच श्रीलंका संघाकडून जयविक्रमाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
भारताने 447 धावांचे लक्ष्य श्रीलंके समोर ठेवले आहे. त्यानुसार श्रीलंका संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंका संघाने 7 षटकांत 1 बाद 28 धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी 419 धावांची गरज आहे. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने 1 विकेट्स घेतली आहे. तसेच भारत क्लीन स्वीप देण्यासाठी 9 विकेट्स दूर आहे.