नवी दिल्ली :टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व करू शकतो ( Shikhar Dhawan can lead team against SA ). एकदिवसीय सामन्यासाठी धवनला ( Veteran batsman Shikhar Dhawan ) कर्णधार बनवले जाऊ शकते. वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या संघात समाविष्ट असलेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मासह ( Captain Rohit Sharma ) विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे महत्त्वाचे खेळाडू संघाचा भाग नसतील. याशिवाय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा संघाचे नेतृत्व करू शकतो. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी-20 वर्ल्डचा आठवा हंगाम होणार आहे.