डरबन (द. आफ्रिका) Ind Vs SA T20 : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. येथे दोन संघांमध्ये ३ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना रविवारी (१० डिसेंबर) डरबनमध्ये खेळला जाणार होता. मात्र त्याआधीच तेथे पाऊस सुरू झाला. यामुळे नाणेफेक न होताच सामना रद्द करण्यात आला.
सूर्यकुमार यादव नेतृत्व करतोय : या टी २० मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. नुकत्याच मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतही त्यानं कर्णधारपद सांभाळलं होतं. या मालिकेत भारतीय संघानं ४-१ असा विजय मिळवला होता.
डरबनमध्ये भारतीय संघाचा इतिहास : भारतीय संघानं डरबनमध्ये आतापर्यंत (आजचा सामना वगळता) ५ टी २० सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामन्यात विजय मिळवला, तर एक सामना बरोबरीत राहिला. या मैदानावरील भारताचा एक टी २० सामना अनिर्णित राहिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या मैदानावर फक्त एक सामना (२००७ टी २० विश्वचषक) खेळला गेला होता. यामध्ये टीम इंडियानं ३७ धावांनी विजय मिळवला होता.
टी २० मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड
- एकूण सामने - २५
- भारत विजयी- १३
- दक्षिण आफ्रिका विजयी- १०
- अनिर्णित- २
लुंगी एनगिडी मालिकेतून बाहेर : या सामन्याआधी आफ्रिकन संघासाठी एक वाईट बातमीही समोर आली. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे. लुंगीच्या जागी बुरॉन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला. ३३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज हेंड्रिक्सनं २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा टी २० सामना खेळला होता. त्यानं १९ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत.
दोन्ही संघ :
भारत - एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी (पहिला आणि दुसरी टी-२०), डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सेन (पहिला आणि दुसरी टी-२०), हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ब्यूरन हेंड्रिक्स, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.
दक्षिण आफ्रिका - यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
हेही वाचा :
- U19 आशिया कप स्पर्धा; पाकिस्तान विजयी, भारताचा दारूण पराभव