महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA 3rd T-20 : ऋतुराज आणि इशानच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचे दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य - Ishan Kishan half century

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऋतुराज आणि इशान किशनने अर्धशतक झळकावले.

IND
IND

By

Published : Jun 14, 2022, 9:31 PM IST

विशाखापट्टणम: मंगळवारी विशाखापट्टणम येथील डॉ वायएस रेड्डी स्टेडियमवर पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध, नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 5 बाद 179 धावा करताना दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य दिले आहे.

टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज गायकवाड शानदार खेळी खेळून बाद झाला. त्याने 35 चेंडूत 57 धावांची खेळी ( Ruturaj Gaikwad's half century ) खेळली. ऋतुराजने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. ऋतुराजला केशव महाराजने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याच्याशिवाय इशान किशनने 35 चेंडूत 54 धावा ( Ishan Kishan half century ) केल्या. आपल्या खेळीत ईशानने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. इशानला ड्वेन प्रिटोरियसने रीझा हेंड्रिक्सच्या हाती झेलबाद केले. हार्दिक पांड्याने नाबाद 31 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने ( Bowler Dwayne Pretorius ) सर्वाधिक दोन बळी घेतले.

हेही वाचा -India Qualify for Asian Cup : भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा पोहोचला एएफसी आशियाई चषक स्पर्धेत

ABOUT THE AUTHOR

...view details