महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SAvIND 3rd Test : गौतम गंभीरने विराटच्या 'स्टंप माइक' प्रकरणावर 'या' शब्दात दिली प्रतिक्रिया - गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले

गौतम गंभीरने कोहलीच्या प्रतिक्रियेवर टीका ( Gambhir criticizes Kohli reaction ) केली आणि ती अपरिपक्व असल्याचे म्हटले. अशी प्रतिक्रिया युवा क्रिकेटपटूंसाठी वाईट उदाहरण ठरते, असे माजी खेळाडूने म्हटले आहे.

Virat Kohli
विराट कोहली

By

Published : Jan 14, 2022, 5:27 PM IST

नवी दिल्ली : न्यूलँड्स येथील निर्णायक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर डीआरएस रिव्ह्यूच्या निर्णयाने पायचित पासून बचावला. त्यानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने ( Indian Test captain Virat Kohli ) स्टंप माइकवर बोलून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने गुरुवारी कसोटी कर्णधार विराट कोहलीवर टीका केली ( Gautam Gambhir criticizes Virat Kohli ) आहे.

अंपायर इरास्मस यांनी डीआरएसचा निर्णय येण्यापूर्वी एल्गरला बाद दिले होते. परंतु बॉल ट्रॅकिंग तंत्रामध्ये असे दिसून आले की, चेंडू स्टंपवरून जात होता आणि त्यामुळे रिव्ह्यूचा निर्णय मान्य केला. त्यामुले मैदांनी पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. ज्यावर विराट कोहलीने नाराज होत असभ्य वर्तन केले.

त्यामुळे गंभीरने कोहलीच्या प्रतिक्रियेवर टीका केली आणि तो अपरिपक्व असल्याचे ( Gambhir called Kohli reaction immature ) म्हटले. अशी प्रतिक्रिया युवा क्रिकेटपटूंसाठी वाईट उदाहरण ठरते, असे माजी खेळाडू म्हणाला आहे.

गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले ( Gambhir told Star Sports ) की, "कोहली खूपच अपरिपक्व आहे. स्टंपवर असे बोलणे भारतीय कर्णधारासाठी सर्वात वाईट आहे. असे केल्याने तुम्ही तरुणांसाठी कधीही आदर्श बनू शकणार नाही."

तो पुढे म्हणाला, "कोहलीने जे केले ते खरोखरच वाईट आहे. स्टंप माईकवर जाऊन अशी प्रतिक्रिया देणे, ते खरोखरच अपरिपक्व आहे. तुम्ही भारतीय कर्णधाराकडून अशी अपेक्षा करू नका, कारण तंत्र तुमच्या हातात नाही."

गंभीर एल्गरबद्दल बोलताना म्हणाला, सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत भारताचा फलंदाज मयंक अग्रवाल बाद असताना नाबाद ठरवण्यात आले. तेव्हा एल्गरने किती शांतपणे प्रतिक्रिया दिली. डीन एल्गरने कोहलीप्रमाणे प्रतिक्रिया दिली नव्हती, जशी विराट कोहलीने दिली आहे. हे वर्तन थांबवण्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Head Coach Rahul Dravid ) यांनी कोहलीशी बोलले पाहिजे, असे गौतम गंभीर म्हणाला.

हेही वाचा - SAvIND 3rd Test : तिसऱ्या पंचांनी डीन एल्गर नाबाद घोषित केल्यानंतर विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 'असा' व्यक्त केला राग; पहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details