विशाखापट्टणम:भारत आणि दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa ) संघात सुरु असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तसेच हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. त्याचबरोबर या मालिकेतील निर्णायक आणि तिसरा सामना आज (मंगळवारी) डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिका संघाने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( South Africa opt to bowl ) आहे.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी, टी-20 क्रिकेटमध्ये एका संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम असलेल्या सलग 13 विजयांचा विक्रम करण्यासाठी भारताला दावेदार मानले जात होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी दिल्ली आणि कटकमध्ये सलग सामने गमावल्यानंतर भारतावर मालिका गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे आज मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला विजय मिळवणे आवश्यक ( Indian team needs victory ) आहे. म्हणून आजचा सामना भारतीय संघासाठी करो या मरोचा आहे.