विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना ( IND vs SA 3rd T-20 ) आज डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी विजय मिळवला ( India won by 48 runs ). प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 बाद 179 धावा करताना दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 19.1 षटकांत सर्वबाद 131 धावाच करु शकला.
टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज गायकवाड शानदार खेळी खेळून बाद झाला. त्याने 35 चेंडूत 57 धावांची खेळी ( Ruturaj Gaikwad's half century ) खेळली. ऋतुराजने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. ऋतुराजला केशव महाराजने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याच्याशिवाय इशान किशनने 35 चेंडूत 54 धावा ( Ishan Kishan half century ) केल्या. आपल्या खेळीत ईशानने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. इशानला ड्वेन प्रिटोरियसने रीझा हेंड्रिक्सच्या हाती झेलबाद केले. हार्दिक पांड्याने नाबाद 31 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने ( Bowler Dwayne Pretorius ) सर्वाधिक दोन बळी घेतले.