महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA 1st T20 :पहिल्या टी-20 सामन्याची तब्बल 'इतक्या' तिकिटांची झाली विक्री - फिजिओ कमलेश जैन

नोव्हेंबर 2019 नंतर प्रथमच दिल्लीत आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला जात आहे. सुमारे 27,000 तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी आता फक्त 400-500 तिकिटे शिल्लक ( 400-500 tickets left ) आहेत.

IND
IND

By

Published : Jun 7, 2022, 3:15 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa ) यांच्यात गुरुवारी येथे होणाऱ्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची 94 टक्के तिकिटे विकली गेली ( First T20 Match Tickets 94% sold ) आहेत. अरुण जेटली स्टेडियमची क्षमता 35,000 प्रेक्षकांची आहे. नोव्हेंबर 2019 नंतर प्रथमच दिल्लीत आंतरराष्ट्रीय सामना आयोजित केला जात आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) सहसचिव राजन मनचंदा यांनी सांगितले की, 94 टक्के तिकिटांची विक्री झाली आहे. आता फक्त 400-500 तिकिटे उरली आहेत.

सुमारे 27,000 तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मनचंदा म्हणाले, ज्येष्ठ नागरिक स्टेडियममध्ये जाण्यासाठी गोल्फ कार्टचा वापर करू शकतात. कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात असली तरी, DDCA ने प्रेक्षकांना खाण्या-पिण्याव्यतिरिक्त प्रत्येक वेळी मास्क घालण्याची विनंती केली आहे. मनचंदा म्हणाले, आमच्या कर्मचाऱ्यांची नियमित चाचणी घेतली जात आहे. आम्ही दर्शकांना विनंती करतो की, त्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे आणि नेहमी मास्क घालावा.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20: कमलेश जैन भारतीय संघात नवीन फिजिओ म्हणून सामील

येथील अरुण जेटली स्टेडियमवर 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी फिजिओ कमलेश जैन ( Physio Kamlesh Jain ) भारतीय वरिष्ठ संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाले आहेत. क्रिकबझच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, जैन हे कोलकाता नाईट रायडर्सचे माजी सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत. त्यांनी नितीन पटेल यांची जागा घेतली आहे. आता त्यांना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये हलवण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, जैन सोमवारी (6 जून) नवी दिल्लीत भारतीय संघात सामील झाले.

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी अरुण जेटली स्टेडियमवर सुमारे तीन तास सराव केला आणि जैन यांनी खेळाडूंना मदत केली. नवी दिल्लीतील पहिल्या T20 सामन्यानंतर, संघ दुसऱ्या सामन्यासाठी 12 जून रोजी कटक, 14 जून रोजी विझाग, 17 जून रोजी राजकोट आणि 19 जून रोजी बंगळुरू येथे जातील.

हेही वाचा -Khelo India Youth Games : खेलो इंडिया युवा स्पर्धेवर महाराष्ट्राचे वर्चस्व; 9 सुवर्ण पदकांची कमाई

ABOUT THE AUTHOR

...view details