माउंट मोंगनुई : आयसीसी महिला विश्वचषक ( Women World Cup ) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 7 बाद 244 धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाला 245 धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आपली पहिली विकेट शेफाली वर्माच्या रुपाने गमावली. त्यानंतर यातून सावरताना भारतीय संघाने दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांचा भागीदारी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा 40(57) धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधानाने 52, पूजा 67 आणि स्नेहा राणा 53 यांनी धावा करत भारतीय संघात महत्वाचे योगदान दिले.
त्यामुळे भारतीय संघाने दोनशे धावांचा टप्पा पार केला. तसेच 7 फलंदाज गमावून 244 ही धावसंख्या उभारली. पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना निदा दार आणि नशरा संधू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.