पल्लेकल्ले : Ind Vs Pak Asia Cup : आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं पाणी फिरलं आहे. आजचा सामना रद्द करण्या आला आहे. आजच्या सामन्यात सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी भारताचा बिनबाद २० धावा झाल्या होत्या. त्यानंतर खेळ सुरू झाला तेव्हा थोड्याच फरकानं भारताला दोन दणके बसले. कर्णधार रोहित शर्माबरोबरच आघाडीचा फलंदाज विराट कोहलीही बाद झाला. रोहितने ११ तर कोहलीने फक्त ४ धावा काढल्या. श्रेयस अय्यरचीही विकेट पडली. केवळ १० षटकात भारताचे ३ गडी बाद झाले. यानंतर भारताचा डाव थोडा सावरतोय असं वाटत असतानाच शुभमन गिल याची विकेट गेली आहे. तो फक्त १० धावा काढू शकला. त्याला रौफनं बाद केलं. मैदानावर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या फलंदाजीनं भारताची बाजू चांगलीच सावरली. २६६ धावा काढून भारतानं पाकिस्तानपुढे २६७ धावांचं आव्हान ठेवलं.
सामन्यात इशान किशन आणि हार्दिक पांड्याने चांगलीच फटकेबाजी केली. इशानचं अर्धशतक आधी पूर्ण झालं. तर पाड्यानंही नंतर अर्धशतक पूर्ण केलं. भारतानं सुरुवातीलाच अनेक चांगले मोहरे गमावल्यानं परिस्थिती बिकट झाली होती. मात्र या दोघांनी डाव सावरला. त्यावेळी ३१ षटकं झाली होती. अजून १९ षटकं बाकी होती. या दोघांचा चांगलाच जम बसला. त्यामुळे भारताला चांगलीच धावांची मजल मारता आली.
त्यानंतर ईशान किशनची विकेट गेली. रौफनं त्याला बाद केलं. रौफची या सामन्यातील ही तिसरी विकेट होती. रौफच्या चेंडूवर बाबरनं त्याला झेलबाद केलं. मैदानावर हार्दिक पांड्या आणि रविद्र जडेजा खेळत होते पांड्याचं अर्धशतक पूर्ण झालं.
शेवटच्या शतकांमध्ये पुन्हा खेळात रंग भरला. भारताच्या आणखी तीन विकेट गेल्या आहेत. पांड्या, जडेजा आणि ठाकूर हे तिघेही तंबूत परतले. पंड्याने ८७ धावा केल्या. शाहीनच्या चेंडूवर आगाने त्याला झेलबाद केलं. तर जडेजा फक्त १४ धावा काढून तंबूत परतला. तर ठाकूरने फक्त ३ धावा काढल्या. भारताचा नववा गडीही बाद झाला. कुलदीप यादव ४ धावा काढून तंबूत परतला. शेवटी भारताच्या नऊ बाद २६६ धावा झाल्या. शेवटची विकेट जसप्रीत बुमराहची पडली. तो १६ धावा काढून झेलबाद झाला. पाकिस्तानपुढे आता २६७ धावांचं आव्हान आहे.