महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC Final: पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, चाहत्यांची निराशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे.

IND vs NZ WTC Final, Day 4: Play abandoned due to rain on Day 4
WTC Final: पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, चाहत्यांची निराशा

By

Published : Jun 21, 2021, 8:59 PM IST

साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. आज एकही चेंडू खेळवला गेला नाही. तब्बल पाच तास खेळ सुरू होण्याची वाट पाहण्यात आली, पण पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेंमीची निराशा झाली आहे.

काइल जेमिसन भारतासाठी ठरला कर्दनकाळ -

काइल जेमिसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. यात जेमिसनने २२ षटके फेकत ३१ धावांत ५ गडी बाद केले. २६ वर्षीय गोलंदाजांने तब्बल १२ षटके निर्धाव फेकली.

जेमिसनचा खास विक्रम -

जेमिसनने रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह जेमिसनने इतिहास रचला. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा एका डावात ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने भारताचा आर. अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिओनला मागे टाकलं. या सर्वांनी प्रत्येकी ४-४ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर जेमिसनने ५ वेळा ही किमया साधली.

न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड -

भारताचा डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या सलामीवीर जोडीने अर्धशतकी सलामी दिली. लॅथम आणि कॉनवे या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. अश्विनने लॅथमला (३०) विराटकडे झेल देण्यास भाग पाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कानवे आणि विल्यमसन या जोडीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली. यादरम्यान, कानवेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इशांत शर्माने कानवेला (५४) बाद केलं. त्याचा झेल शमीने टिपला. केन विल्यमसन १२ तर अनुभवी रॉस टेलर शून्यावर नाबाद आहेत. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत.

हेही वाचा -WTC Final: पावसाचा खेळखंडोबा, जेमिसन रंगला टेबल टेनिस खेळात; चाहते म्हणाले, हे तरी लाईव्ह दाखवा

हेही वाचा -WTC Final : यापेक्षा काय थरारक काय असेल?, ICCने शेअर केला भारतीय गोलंदाजाचा 'सुपरफास्ट' मारा

ABOUT THE AUTHOR

...view details