महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND Vs NZ ODI : भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, हार्दिक पुन्हा संघात - हार्दिक पुन्हा संघात

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या या खेळपट्टीवर सरासरी स्कोअर 270 आहे. त्यामुळे हा सामना 300 प्लस स्कोअरचा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jan 18, 2023, 2:30 PM IST

हैदराबाद :हैदराबादच्याराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीच्या वेळी संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, खेळपट्टी चांगली आहे आणि थोडी कोरडीही आहे.

भारतीय संघाची प्लेइंग 11 :भारतीय संघाची प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे-शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. हैदराबादचे उप्पल मैदान टीम इंडियाला अनुकूल आहे. या आधीही या मैदानावर भारताने शेवटचे तीन सामने जिंकले आहेत. हा सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या खेळपट्टीवर सरासरी स्कोअर 270 आहे. त्यामुळे हा सामना 300 प्लस स्कोअरचा असेल असा अंदाज आधीच वर्तवला जात आहे. या सोबतच या स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांची फिरकी अधिक काम करते, असाही अंदाज आहे. यामुळे या सामन्यात चायनामन स्पिनर कुलदीप यादवची भूमिका महत्वाची असणार आहे.

दोन्ही संघ फॉर्ममध्ये : भारतीय संघाने २०२३ वर्षाची सुरुवात चांगली केली आहे. भारताने नुकतेच श्रीलंकेला घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केले. आता भारतीय संघ न्यूझीलंडला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून भारतात दाखल झाला आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्धच्या त्यांच्या मागील मालिकेतील चांगला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

टीव्हीवर हा सामना कुठे बघायचा? :भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. चाहते IND vs NZ चे थेट प्रक्षेपण Star Sports 1/HD, Star Sports 2/HD आणि Star Sports 1 हिंदी/HD वर पाहू शकतात. IND vs NZ 1ल्या ODI सामन्याचे प्रसारण प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. या एकदिवसीय मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे त्याच्या ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर केले जाईल. प्रेक्षक डिस्ने + हॉटस्टार अॅप किंवा वेबसाइटवर हा सामना ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे पाहू शकतात.

हेही वाचा :IND VS NZ 1st ODI : रोहितही झाला सिराजच्या गोलंदाजीचा फॅन, म्हणाला..

ABOUT THE AUTHOR

...view details