लंडन -भारतीय संघाचा लीड्स कसोटी सामन्यात दारूण पराभव झाला. यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर जोरदार टीका होत आहे. अशात ते गुरूवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात कडवी झुंज देऊ शकतात. यामुळे आम्ही स्वत:ला तयार करत आहोत, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड यांनी दिली. दरम्यान, भारताचा लीड्स कसोटी सामन्यात एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला होता. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
पॉल कॉलिंगवूड यांनी भारताच्या मोजक्या पत्रकारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बातचित केली. यात बोलताना ते म्हणाले की, आम्ही चांगली गोलंदाजी केली, असे मला वाटते. तुम्ही जर भारतीय समर्थक असाल तर टीका करणे सोपे आहे. पण पहिल्या दिवशी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर खेळणे सोप्प नाही.
विराट कोहलीने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितलं की, इंग्लंड संघाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला आणि संधी दिली नाही. आमच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना झुंजावे लागले. यामुळे मला वाटत की, आमची गोलंदाजी सटीक होती, असे देखील पॉल कॉलिंगवूड म्हणाले.