हेडिंग्ले - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला 'लंबी रेस का घोडा' म्हटले जाते. कारण त्याने खूप काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवले आहे. या गुपिताचा खुलासा त्याने केला आहे. अँडरसन म्हणाला की, मी नेट्सवर कमी वेळ घालवतो आणि ती ऊर्जा मी सामन्यासाठी राखून ठेवतो.
जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भेदक मारा केला. त्याने 8 षटकात 6 धावा देत भारताचे अव्वल 3 फलंदाजांना बाद केले. विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अँडरसनसह इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 78 धावांत ढेपाळला. यात अँडरसनने मोलाची भूमिका निभावली.
जेम्स अँडरसन पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यनंतर बोलताना म्हणाला की, वाढत्या वयामुळे जीममध्ये अधिक कष्ठ घेण्याची गरज आहे, असे मला वाटते. मी नेट्सवर कमी गोलंदाजी करतो आणि ती ऊर्जा मी सामन्यासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण सामना महत्वाची ही बाब आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये मोठे स्पेल करणे हे आव्हान असते. तसेच मोठ्या सामन्यात खेळण्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. अशा सामन्यात स्वत:ला ऊर्जावान बनवण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत नाही. तेव्हा ऊर्जा राखून ठेवणे गरजेचे असते. ते मी करतो, असे देखील जेम्स अँडरसनने सांगितलं.