लंडन - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत होणार आहे. उभय संघातील मालिका ऑगस्ट-सप्टेंबर या काळात होणार आहे. परंतु मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे सुरूवातीच्या कसोटीला मुकणार असल्याचे वृत्त आहे.
एका क्रीडा संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, शुबमन दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. असे असले तरी अद्याप त्याच्या दुखापतीच्या स्वरूपाविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही.