लंडन - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धारदार गोलंदाजी करत आपण लयीत आल्याचे सांगितलं आहे. यादरम्यान, इंग्लंडचा धाकड फलंदाज जॉनी बेअरस्टो याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले.
जॉनी बेअयरस्टो म्हणाला की, जसप्रीत बुमराहकडे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात गोलंदाजी करण्याचे अद्भभूत कौशल्य आहे. मी तुम्हाला बुमराहविषयीच्या चर्चेबाबत सर्व काही सांगू शकत नाही. परंतु आम्ही जाणतो की, बुमराहकडे अद्भभूत कौशल्य आहे. तो अॅक्शनसोबत क्रीजचा देखील वापर करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, तिची अॅक्शन आणि रनअप थोडासा वेगळा आहे.
बुमराहने फक्त 20-21 कसोटी सामने खेळली आहेत. मागील मालिका पाहता यातील 6 सामने तर त्याने इंग्लंडविरुद्ध खेळली आहेत. तो परिस्थिती पाहून आपल्या कौशल्यात बदल करतो. याचे श्रेय बुमराह दिलं पाहिजे. तो एक जागतिक स्तराचा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये, भारताकडून खेळताना व्हाइट चेंडूवर खेळताना आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याला शानदार कामगिरी करताना पाहिलं असल्याचे देखील बेअरस्टो म्हणाला.