महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Video : टीम इंडियाच्या ओवल कसोटीतील ऐतिहासिक विजयावर मोहम्मद कैफचा 'नागिन डान्स' - भारत

भारतीय संघाने जर चौथा कसोटी सामना जिंकला तर मी नागिन डान्स करेन, असे आश्वासन मोहम्मद कैफने विरेंद्र सेहवागसोबत समालोचन करताना दिले होते. भारताने चौथ्या सामन्यात विजय मिळवला. तेव्हा कैफने नागिन डान्स करत ते आश्वासन पूर्ण केले.

ind vs eng : india's former cricketer Mohammad Kaif perfects 'Naagin Dance' moves, netizens go crazy
Video : टीम इंडियाच्या ओवल कसोटीतील ऐतिहासिक विजयावर मोहम्मद कैफचा 'नागिन डान्स'

By

Published : Sep 8, 2021, 9:00 PM IST

मुंबई - भारतीय संघाने ओवल कसोटी सामन्यात खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारतीय संघाने या मैदानावर 50 वर्षांनंतर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 191 धावांवर ऑलआउट झाला. तेव्हा इंग्लंडने 290 धावा करत 90 धावांची आघाडी मिळवली. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात जोरदार वापसी करत 466 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 368 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 210 धावांत ऑलआऊट झाला आणि भारताने सामना आपल्या नावे केला. भारताचा विजयानंतर माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने फॅन्सना दिलेले आश्वासन पूर्ण केले.

नेमके काय आहे प्रकरण -

भारतीय संघाने जर चौथा कसोटी सामना जिंकला तर मी नागिन डान्स करेन, असे आश्वासन मोहम्मद कैफने विरेंद्र सेहवागसोबत समालोचन करताना दिले होते. भारताने चौथ्या सामन्यात विजय मिळवला. तेव्हा कैफने नागिन डान्स करत ते आश्वासन पूर्ण केले. भारतीय संघाचा चपळ क्षेत्ररक्षक अशी ओळख बनवलेल्या मोहम्मद कैफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो नागिन डान्स करताना पाहायला मिळत आहे. फॅन्स देखील कैफच्या नागिन डान्सवर मजेशीर कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर कॅफचा हा नागिन डान्स खूप व्हायरल होत आहे. कॅफने या व्हिडिओला 'भाई लोग, आप की फरमाईश पे' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

मोहम्मद कैफ 25 सेंकदाच्या व्हिडिओत अल्ट्रा मोशन्समध्ये नागिन डान्स करताना पाहायला मिळत आहे. तो ज्यावेळी डानस करत आहे. तेव्हा त्याच्या पाठीमागे 'शाबा, शाबा' ची धून वाजत आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यजमान इंग्लंड संघाने अखेरच्या कसोटी सामन्यात जोस बटलर आणि फिरकीपटू जॅक लीच यांना संघात स्थान दिलं आहे.

हेही वाचा -Ind VS Eng : भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज - मार्क वूड

हेही वाचा -मँचेस्टर कसोटीसाठी मोहम्मद शमी फिट; रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा मेडिकल टीमच्या निघराणीत

ABOUT THE AUTHOR

...view details