नवी दिल्ली -भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. परंतु पावसामुळे अखेरच्या पाचव्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. उद्यापासून उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मालिका जिंकण्यासाठी, आमचा संघ संतुलित असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, उभय संघात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे.
एएनआयशी बोलताना जडेजाने सांगितलं की, कर्णधार विराट कोहलीच्या मानसिकतेमुळे संघात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास कशी मदत झाली. तो म्हणाला, आम्ही मागील दोन महिन्यांपासून यूकेच्या वातावरणात सराव करत आहेत. त्यामुळे आम्हाला या मालिकेआधी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला. पण मागील वेळी याबाबतीत आम्ही कमनशीबी ठरलो. पण आता संतुलित संघ आहे. संघात अष्टपैलू खेळाडू, चांगले वेगवान गोलंदाज, फिरकीपटू आणि फलंदाज आहेत. संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. यामुळे मला वाटत की आम्हाला मालिका जिंकण्याची संधी आहे.
दरम्यान, पहिल्या सामन्यात जडेजाने शानदार फलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 56 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यामुळे भारताला 97 धावांची आघाडी मिळाली होती. पण पावसाने सामन्यात खोडा घातला. यामुळे भारताच्या विजयाची संधी गेली.
सीमित षटकाच्या सामन्याच्या स्पेशालिस्ट असताना तु कसोटीत खेळण्यासाठी काही बदल केले का असे विचारले असता, जडेजा म्हणाला, मी माझ्या कौशल्यात कोणताही मोठा बदल केला नाही. मी स्वत:वर विश्वात ठेवतो. जेव्हा मला फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मिळते. तेव्ही मी स्वत:वर विश्वास करत माझ्यातील सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करतो. हा माझ्यातील बदल आहे. सामन्याआधी मी माझ्या मजबूत बाबींवर लक्ष्य केंद्रित करतो आणि यात आणखी काय सुधारणा करता येतील, त्या मी करतो. यात फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असो. मी यात आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतो.