लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातीत पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना अचानक रद्द करण्यात आला. नाणेफेकीच्या 90 मिनिटाआधी भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे इंग्लंड क्रिकेटर विराट कोहलीच्या संघावर नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघावर टीका केली आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी उभय संघातील कसोटी सामना रद्द होण्यास आयपीएलला जबाबदार धरले आहे. या नाराज खेळाडूंमध्ये आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याची भर पडली आहे.
काय म्हणाला अँडरसन
जेम्स अँडरसन याने इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या उन्हाळी हंगामाचा अशाप्रकारे शेवट होणे हे लाजिरवाणे आहे. मी लंकाशायर क्रिकेटसाठी निराश आहे. तसेच मी त्या फॅन्ससाठी देखील नाराज आहे ज्यांनी तिकिट, ट्रेन, हॉटेलसाठी पैसे दिले होते. दोन्ही संघाचे पाठिराखे या मालिकेचा शेवट पाहून इच्छित होते. मला आशा की, हा सामना कधीतरी पुन्हा खेळला जाईल. माझे हे होम ग्राउंड असून मला याच्यावर खूप प्रेम आहे. याच मैदानावर मला आणखी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास मिळेल.