बर्मिंघम:एजबॅस्टन येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा कसोटी ( IND vs ENG 5th Test ) सामना पार पडला. या सामन्यत यजमान इंग्लंड संघाने भारतावर 7 गडी राखून मात ( England won by 7 wickets ) केली. त्याचबरोबर त्यांनी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2अशी बरोबरी साधली. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 378 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) यांनी शतकी खेळी करत हे लक्ष्य 76.4 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.
रिषभ पंत-रविंद्र जडेजाच्या खेळी व्यर्थ -
जो रूटने 142 ( Joe root 142 Runs ) आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावा केल्या. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्षाचा यशस्वीपणे पाठलाग केला. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. 132 धावांच्या आघाडीसह भारताने दुसऱ्या डावात 284 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते.