ओवल - भारतीय संघाने इंग्लंडविरोधात ओवलमध्ये खेळवण्यात येत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काळ्या फितीसह मैदानात उतरत, प्रसिद्ध दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. यात खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधलेले पाहायला मिळत आहेत.
बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो ट्विट करताना म्हटलं की, वासुदेव परांजपे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.
भारतीय संघाच्या या निर्णयावर वासुदेव परांजपे यांचा मुलगा जतिन परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, परांजपे परिवार तुमच्या या भावनेने प्रभावित झालं आहे.
दरमयान, वासुदेव परांजपे यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 29 प्रथम श्रेणी सामने खेळली. यात त्याच्या नावे 785 धावा आहेत. पण ते प्रशिक्षक म्हणून खूप प्रसिद्ध होते. त्यांचे मुंबईतील माटुंगा येथे सोमवारी (30 ऑगस्ट) निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.