नॉटिंघम:सध्या भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG ) संघात कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अंतिम आणि तिसरा टी-20 सामना रविवारी (10 जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी रोहित शर्मा आणि जोस बटलर या दोन कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( England opt to bat ) घेतला आहे.
आजच्या तिसऱ्या सामन्यांसाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत, त्याचबरोबर इंग्लंड संघात देखील दोन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात आवेश खान, उमरान मलिक रवि बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड संघात रीस टॉप्ली आणि फिल सॉल्ट यांना संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ या मालिकेतील पहिला सामना 50 धावांनी आणि दुसरा सामना 49 धावांनी जिंकून 2-0 ने विजयी आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने विजय खेचून आणला. त्याचप्रमाणे आजचा ही सामना जिंकून इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ असणार आहे. दुसरीकडे जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ या मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी झगडताना दिसेल.