नॉटिंगहॅम - भारत आणि इंग्लंड यांच्यात आज ( 9 जुलै ) तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती ही लढत झाली. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 17 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून सात बाद २१५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारताने 20 षटकांत 198 धावाच केल्या आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून इंग्लंडला त्यांच्याच भूमीत क्लिनस्वीप देण्याची सुवर्णसंधी रोहित सेनाने गमावली आहे. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली ( England avoid whitewash defeat India by 17 runs ) आहे.
Ind vs Eng 3rd T20 : सुर्यकूमार एकटा लढला; पण इंग्लंडने सामना 17 धावांनी जिंकला - England avoid whitewash defeat India by 17 runs
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून सात बाद २१५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारताने 20 षटकांत 198 धावाच केल्या आहेत. इंग्लंडने भारतावर 17 धावांनी मात ( England avoid whitewash defeat India by 17 runs ) केली.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडने 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 215 धावा ठोकल्या. मात्र, प्रत्तुत्तरात उतरलेल्या भारताकडून सुर्यकुमार यादवने एकट्याने खिंड लढवली. त्याने ५५ चेंडूत ६ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. पण, त्याला अन्य साथीदारांची साथ लाभली नाही. सुर्यकूमारला सोडता अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावाही ठोकता आल्या नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली 11 धावांवर बाद झाले. श्रेयस अय्यरने २३ चेंडूत २८ धावा केल्या. तर, अन्य खेळाडूंनी फक्त एक धावावर समाधान मानले.
हेही वाचा -T20 World Cup Promo : आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या प्रोमो व्हिडिओमध्ये ऋषभ पंतला दिले स्थान