लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम दिवशी पावसाने खोडा घातला. यामुळे हा सामना ड्रॉ राहिला. आता उभय संघातील दुसरा कसोटी सामना उद्या गुरूवारपासून लॉर्ड्सवर रंगणार आहे. हे ते मैदानात आहे जिथे इंग्लंड संघाचे प्रभुत्व राहिलं आहे. यामुळे भारतीय संघाला या सामन्यात दमदार खेळ करावा लागणार आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला होता. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर ही ती चौकडी होती. तर रविंद्र जडेजाच्या रुपाने एक फिरकीपटू होता. परंतु काही लोकांना आर अश्विनला अंतिम संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण आता शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आर अश्विनला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळू शकते.
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचे प्रदर्शन काही खास नव्हते. सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने 97 धावांची सलामी दिली. परंतु चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंनी निराशा केली. पण पुनरागमन करणाऱ्या केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी दमदार फलंदाजी केली.
विराट विरुद्ध अँडरसन मुकाबला -
दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली विरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा मुकाबला पाहायला मिळू शकतो. अँडरसनने पहिल्या कसोटी सामन्यात विराटला गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. पण दुसऱ्या सामन्यात विराटचे शानदार पुनरागमनाची अपेक्षा भारतीय संघाला आहे.
इंग्लंडचे फलंदाज आउट ऑफ फॉर्म -