बर्मिंगहॅम:भारत विरुद्ध इंग्लंड ( IND vs ENG ) संघात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी पार पडला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 49 धावांनी विजय ( India won by 49 runs ) मिळवला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने विजय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला 171 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु इंग्लंडचा संघ 121 धावांवर आटोपला.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला ऋषभ पंत ( Batsman Rishabh Pant ) आणि रोहित शर्मा ही नवी सलामी जोडी डावाची उतरली होती. या जोडीने स्फोटक सुरुवात केली. कारण भारताने अवघ्या पाच षटकांत पहिल्या विकेट्साठी 49 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर भारताच्या विकेट सातत्याने पडल्यामुळे 89धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. यादरम्यान विराट कोहली (1), सूर्यकुमार यादव (15) आणि हार्दिक पांड्या (12) काहीही न करता लवकर बाद झाले.
यावेळी फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक या जोडीने विकेट पडण्याची प्रक्रिया थांबवली. मात्र, यादरम्यान दिनेशने संथ खेळी खेळल्याने तो 17 चेंडूत केवळ 12 धावाच करू शकला. मात्र दुसऱ्या टोकाकडून रवींद्र जडेजाने ( All-rounder Ravindra Jadeja ) आक्रमक वृत्ती स्वीकारत डाव पुढे नेण्याचे काम सुरूच ठेवले. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये जडेजाने आपली विकेट वाचवली आणि गोलंदाजांवरही हल्ला चढवला. त्याने 29 चेंडूंमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 46 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 170 धावा केल्या.