हैदराबाद - ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवशीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्यात निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा शानदार कामगिरी करत इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 49 षटकात 246 धावांत गुंडाळले ( IND vs ENG 2nd ODI ) आहे. भारताकडून युजवेंद्र चहलने 10 षटकात 47 धावा घेत चार बळी घेतले आहेत.
इंग्लंडकडून मोईन अली याने 64 चेंडूत 47 धावा केल्या. त्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मोईन अलीने ठोकल्या होत्या. युजवेंद्र चहलने सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने जॉनी बेयरस्टो (38), ज्यो रुट (11) आणि बेन स्टोक्स (21) हे महत्त्वाचे बळी घेतले.