अॅडिलेड : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पुढील सामन्यात भारतीय क्रिकेट संघ ओव्हलच्या खेळपट्टीवर शेजारच्या बांगलादेशशी भिडणार आहे. या मैदानावर ( Adelaide Oval Ground ) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एकच सामना खेळला असून, त्यात शानदार विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात कोहलीने त्यावेळी कर्णधारपदाची खेळी खेळली होती. विराट कोहली ( Former Captain Virat Kohli ) आणि सुरेश रैना ( Indian Cricketer Suresh Raina ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी या मैदानावर सर्वात मोठी ( Biggest Partnership on Adelaide Oval Ground ) भागीदारी करीत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. अॅडिलेडमध्ये बांगलादेशचा हा पहिला टी-२० सामना असेल. 2 नोव्हेंबरला होणार्या उभय देशांमधील सामन्यापूर्वी या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अॅडिलेडच्या ओव्हलवर भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला असून, या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने शानदार विजय मिळवला. अॅडिलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात त्यावेळी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 55 चेंडूत 90 धावा केल्या. त्याच्या कर्णधार खेळीमुळे भारतीय संघाने 3 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाला 189 धावांचे लक्ष्य दिले होते. या खेळीत कोहलीने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.