नवी दिल्ली Ind Vs Ban Asia Cup :आशिया कप-2023 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात या संघाला स्पर्धेबाहेर पडलेल्या बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. बांगलादेशी संघाने 2012 नंतर ही स्पर्धा भारतावर जिंकली आहे. ही स्पर्धा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 50 षटकांत सर्वबाद 259 धावांवर आटोपला.
India Vs Bangladesh Match highlights : आशिया चषक 2023 च्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव २५९ धावांवर आटोपला आणि ६ धावांनी सामना गमावला.
दरम्यान, चालू स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. कारण टीम इंडिया या आधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आशिया चषकाची फायनल १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. तर या विजयासह या स्पर्धेतील बांगलादेशचा प्रवास संपला.
या सामन्यात भारतासमोर विजयासाठी २६६ धावांचे लक्ष्य होते. पण भारतीय संघ ४९.५ षटकांत २५९ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन गिलने १३३ चेंडूत १२१ धावा केल्या. या युवा सलामीवीराने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ५ षटकार ठोकले, मात्र तो टीम इंडियाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
शुबमन गिलशिवाय इतर भारतीय फलंदाजांनी निराशा केली. विशेषत: टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले.