नवी दिल्ली :टीम इंडिया 17 मार्चला ऑस्ट्रेलियासोबत पहिला वनडे सामना खेळणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. संपूर्ण मालिकेत हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असेल. शार्दुल ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे. शार्दुलने 27 फेब्रुवारीला मिताली परुलकरशी लग्न केले.
पाच सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये भारताचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने तीन तर ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत. जर आपण संघांच्या ताज्या कामगिरीबद्दल बोललो, तर दोघांनी आपले शेवटचे पाच एकदिवसीय सामने जिंकले आहेत. कोहली वनडेत 13 हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ : विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. विराट कोहली 272 वा वनडे सामना खेळणार आहे. विराटने 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.7 च्या सरासरीने 12809 धावा केल्या आहेत. कोहली वनडेत 13 हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. जर त्याने 191 धावा केल्या तर तो भारतातील दुसरा आणि जगातील 5वा क्रिकेटर बनेल.