नवी दिल्ली :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 90 षटकांत चार विकेट गमावत 255 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजाने कसोटी कारकिर्दीतील तेरावे शतक झळकावले. ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाच्या डावाचे नेतृत्व करतील. ग्रीन 49 धावांवर खेळत आहे.
ट्री ब्रेकनंतर भारताला यश : 152 ओव्हरनंतर 422/8 धावा भारतीय गोलंदाज अक्षर पटेलला ट्री ब्रेकनंतर मोठे यश मिळाले. अक्षर पटेलने पहिल्या दिवसापासून भारतासाठी अडचणीचा ठरलेल्या उस्मान ख्वाजाला 146 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद केले. उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावा केल्या. यासाठी त्याने 422 चेंडू खेळले. या खेळीत त्याने 21 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 42.65 होता.
कॅमेरून ग्रीनने कसोटी शतक झळकावले :चहाच्या वेळेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 146 षटकांत 409/7 आहे. दुसऱ्या दिवसाच्या दोन सत्रांचा खेळ संपला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी केली. अश्विनने दिवसाच्या दुसऱ्या सत्रात तीन बळी घेतले. कॅमेरून ग्रीनने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. उस्मान ख्वाजा (180) आणि नॅथन लियॉन (6) क्रीजवर आहेत.