इंदूर :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरमध्ये सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या शोधात आहे. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियात परतला आहे. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या कसोटीत कर्णधारपद भूषवणार आहे. ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल करून कॅमेरून ग्रीन आणि मिचेल स्ट्रक यांना संघात स्थान मिळाले आहे.
रोहित-गिल आणि पुजारा बाद : भारताची पहिली विकेट पडली आहे. मॅथ्यू कुहनेमनच्या चेंडूवर रोहित शर्माला यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने क्लीन बोल्ड केले. रोहितने 23 चेंडूत तीन चौकारांसह 12 धावा केल्या. शुभमन गिलची दुसरी विकेट पडली. गिलला कुहनेमनने स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. शुभमनने 18 चेंडूत 21 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराला नॅथन लायनने क्लीन बोल्ड केले. पुजाराने चार चेंडूत एक धाव घेतली. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत.
तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात केलेले बदल :तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे. गेल्या दोन सामन्यात केएल राहुल फ्लॉप ठरला होता. शुभमनने कसोटी सामन्यांमध्ये सलामी दिली आहे. त्याने आत्तापर्यंत 13 कसोटी सामन्यांमध्ये सलामी दिली आहे. शुभमनने कसोटीत 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. उमेश यादवलाही संघात स्थान मिळाले आहे.सूर्यकुमार यादव, इशान किशन यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागपूर कसोटीतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही संघात पुनरागमन करायला आवडेल. यादवला दुसऱ्या कसोटीत वगळण्यात आले. त्याचबरोबर इशान किशनला अद्याप संधी मिळालेली नाही.
भारतीय संघाची प्लेइंग इल्हेवन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक फलंदाज), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इल्हेवन :उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर फलंदाज), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनमन.
हेही वाचा :Michael Kasprowicz on Australian team : तीन वेगवान गोलंदाजांसह इंदूरमध्ये बोलँडचा समावेश करा - मायकेल कॅसप्रोविझ