गुवाहाटी Ind Vs Aus T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (२८ नोव्हेंबर) गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवलं. मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियानं जिंकले होते.
भारताची प्रथम फलंदाजी : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच षटकात परतला. तो ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. तर ईशान किशान भोपळाही फोडू शकला नाही. मात्र त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी भारताचा डाव सांभाळला. एका बाजूनं ऋतुराजनं तुफानी खेळी केली. त्यानं केवळ ५७ चेंडूत १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं १२३ धावा ठोकल्या. सूर्यकुमार ३९ धावा करून बाद झाला. तर तिलक वर्मा ३१ धावा करून नाबाद राहिला. भारतानं निर्धारित २० षटकांत २२२-३ धावा केल्या.
मॅक्सवेलची तुफानी खेळी : धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात वेगवान झाली. मात्र त्यांचे गडी नियमित अंतरानं बाद होत गेले. ट्रॅव्हिस हेडनं १८ चेंडूत ३५ धावा हाणल्या. तर अॅरॉन हार्डी १६ धावा करून बाद झाला. जोश इंग्लिसनं १० धावांचं योगदान दिलं. स्टॉयनिस २१ चेंडूत १७ धाव करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं जोरदार शतक ठोकलं. तो ४८ चेंडूत १०४ धावा करून नाबाद राहिला.
दोन्ही संघांची प्लेइंग ११ :