महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind Vs Aus : दुसरी कसोटी होणार अरुण जेटली स्टेडियमवर; जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी - Arun Jaitley Stadium Delhi

भारताने कसोटी क्रिकेटमधील नंबर वन संघ ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाची चव चाखायला लावली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी कांगारू संघाचा दुसरा डाव 2 तासांत संपवला.

Ind Vs Aus
अरुण जेटली स्टेडियम

By

Published : Feb 12, 2023, 11:06 AM IST

दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर हतबल दिसत होता. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवींद्र जडेजा आणि आर अश्विनच्या फिरकीत अशाप्रकारे अडकले की त्यांचा दुसरा डाव दोन तासात संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात केवळ 30 षटकेच खेळू शकला.

सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज :अरुण जेटली स्टेडियमचा खेळपट्टीचा अहवाल बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. सुरुवातीच्या दिवसांत खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम असेल. सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर कठीण जाण्याची शक्यता आहे. या मैदानावर अनिल कुंबळे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने येथे 7 सामन्यांच्या 14 डावात 58 विकेट घेतल्या आहेत.

30 धावांत पाच बळी : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा येथेही यशस्वी आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजाचा या मैदानावरही मोठा विक्रम आहे. अश्विनने येथे चार कसोटी सामन्यांच्या 8 डावात 27 बळी घेतले आहेत. येथे त्याने एका डावात 47 धावांत सहा विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन व्यतिरिक्त जडेजाची फिरकीही इथे खूप धावते. या मैदानावर त्याने आतापर्यंत तीन सामने खेळले असून 19 बळी घेतले आहेत. त्याने एका डावात 30 धावांत पाच बळीही घेतले आहेत. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेचे वेळापत्रक - 17 ते 21 फेब्रुवारी, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, धर्मशाला चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.

पहिल्या दिवसाची कामगिरी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 1 विकेट गमावून 77 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने एकमेव विकेट घेतली. त्याने केएल राहुलला 20 धावांवर बाद केले. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि आर अश्विन (0) खेळपट्टीवर नाबाद आहेत. दोघेही आज सकाळी साडेनऊ वाजता डावाला सुरुवात करतील. भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 100 धावांनी मागे आहे.

हेही वाचा :Rishabh Pant Love Story : अपघातानंतर ईशानेच घेतली पंतची काळजी, जाणून घ्या कोण आहे ऋषभ पंतची ड्रीम गर्ल!

ABOUT THE AUTHOR

...view details