नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दोन धावा असताना ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा दुसरा धक्काही दोन धावांच्या स्कोअरवर बसला. मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले. वॉर्नरही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करीत ऑस्ट्रेलिया संघाची पुरती गाळण उडाली. ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू अवघ्या 177 धावांवर बाद झाले आहेत.
भारतीय संघाचा डाव :ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ अवघ्या 177 धावांवर बाद झाल्याने भारतीय संघ लवकरच खेळायला उतरला. घरच्या मैदानावर टीम इंडियाने कांगारूंचा धुव्वा उडवला. त्यानंतर भारताने सुरुवात केलेल्या डावात, भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सुरुवात केली. रोहित शर्माने 69 चेंडूत 56 धावा केल्या, तर केएल राहुलने 71 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विन सध्या रोहित शर्मासोबत खेळत आहे. या मॅचमध्ये अश्विनसहित मोहम्मद शमीनेदेखील नवीन गोलंदाजीत विक्रम केला आहे.
रविंद्र जडेचाचे जोरदार कमबॅक :भारताला क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुंदर कामगिरी करीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. रवींद्र जडेजाने जोरदार कमबॅक करीत ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना तंबूत धाडले. रवींद्र जडेजाने 22 षटकांत 8 ओव्हर मेडन टाकत 5 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तसेच, आतापर्यंत झालेल्या सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करीत भारताच्या खात्यात एक विकेट मिळवली. अंपायरने ख्वाजाला नॉट आऊट दिले, पण यष्टिरक्षक केएस भरतच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला. त्यानंतर उस्मान ख्वाजाला आऊट करण्यात आले.
क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष :सामना सुरू होण्याआधीपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. नागपूर स्टेडियममध्ये आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी येथे लोकांची गर्दी होणार आहे हे निश्चित. हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. त्याच्या जागी केएस भरतला संधी मिळाली आहे.