बेंगळुरु IND vs AFG T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज बेंगळुरु इथं खेळवला जाणार आहे. भारतीय संघानं या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या खिशात घातलीय. आता आजच्या सामन्यात भारतीय संघ अन्य खेळाडूंनी संधी देऊ शकतो. तर दुसरीकडं अफगाणिस्तानला आपली प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी आहे. त्यांना सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय.
संजूला संधी मिळणार :टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यातही 6 गडी राखून विजय नोंदवला. संजू सॅमसनला या दोन्ही सामन्यात खेळायची संधी मिळाली नाही. त्याच्याऐवजी भारतीय संघानं यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला संधी दिली. मात्र आजच्या सामन्यात संजूला संधी मिळू शकते. संजू हा अनुभवी खेळाडू असून त्यानं अनेक सामन्यांत चांगली कामगिरी केलीय.
रोहितकडून दमदार कामगिरीची अपेक्षा :भारतीय संघ आजच्या सामन्यांत आवेश खान आणि कुलदीप यादव यांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकतो. कुलदीपनं अनेक वेळा भारतासाठी मॅच विनिंग कामगिरी केलीय. तसंच कर्णधार रोहित शर्माला गेल्या दोन सामन्यात फलंदाजीत विशेष काही करता आलेलं नाही. दोन्ही सामन्यांत तो शून्यावर बाद झालाय. मात्र तो आजच्या तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करू शकतो.
- तिसरा सामना जिंकण्याचा पाहुण्यांचा प्रयत्न :अफगाणिस्ताननं गेल्या दोन सामन्यांत भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांची फलंदाजी चांगली झालीय. अफगाणिस्ताननं पहिल्या सामन्यात 158 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात 172 धावा झाल्या. आता तिसरा सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
- एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताची कामगिरी खराब :बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताचा टी-20 रेकॉर्ड फारसा चांगला राहिला नाही. भारतानं या मैदानावर 7 टी-20 सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यांत विजय तर तीन सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. यामुळं रोहित शर्मा बेंगळुरुमध्ये नव्या रणनीतीसह मैदानात उतरणार आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा/संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल/कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/आवेश खान
- अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झादरान (कर्णधार), गुलबदिन नईब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झादरान, करीम जनत, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजल हक फारुकी
हेही वाचा :
- इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला डच्चू, जाणून घ्या काय म्हणाला अजिंक्य
- मुंबईकर दुबे अन् जयस्वालनं नेला सामना खेचून, भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय